Thursday, April 25, 2024

Latest Posts

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त या पद्धतीने करा साजेसा मराठमोळा लूक

वटपौर्णिमेची प्रत्येक स्त्री आतुरतेने वाट पाहत असते. या दिवशी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आयुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत पाळतात.

वटपौर्णिमेची प्रत्येक स्त्री आतुरतेने वाट पाहत असते. या दिवशी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आयुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत पाळतात. धार्मिक मान्यतेनुसार वटसावित्रीचे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते. या दिवशी स्त्रीया वडाच्या झाडाची पूजा करतात. जसे वडाच्या झाडाचे आयुष्य हे ३०० वर्षापेक्षा जास्त असते तसेच आपल्या पतीलाही दीर्घकालीन आयुष्य लाभुदे यासाठी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. जेष्ठ्य महिन्याच्या पौर्णिमेस साजरी केली जाणारी वटपौर्णिमा यंदा ३ जून २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. वपोर्णिमेच्या दिवशी स्त्रिया अगदी पारंपरिक पद्धतीने तयार होऊन वडाच्या झाडाची पूजा करण्यास जातात. वटपौर्णिमा महाराष्ट्रत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यासाठी बहुतांश स्त्रिया मराठमोळा लूक करण्यास प्राधान्य देतात. पण काही अश्या स्त्रिया आहेत त्यांना मराठमोळा लूक करता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मराठमोळा लूक कसा करावा याबद्दल सांगणार आहोत.

चेहरा स्वच्छ करा (Clean the face)

सर्वप्रथम वटपौर्णिमेसाठी तयार होण्यासाठी तुम्ही सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ फेसवोश (Facewash) ने धुवून घ्या. त्याने तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल आणि तुमचा चेहरा फ्रेश होईल आणि तुम्हाला ताजेतवाने देखील वाटेल. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ देखील फिरवू शकता. बर्फ हा चेहऱ्यावरील तेलकट पण दूर करण्यासाठी वापरला जातो. त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप सुद्धा सेट लवकर निघून जात नाही.

बेस तयार करा (Build the base)

चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला सर्वप्रथम टोनर (Toner) लावा. त्यानंतर मॉईशरायझर (Moisturize) लावा त्याने तुमच्या चेहऱ्याला कोणतीच हानी होणार नाही आणि तुमची त्वचा स्मूथ (Smooth) राहील. वडाची पूजा ही भर उन्हात केली जाणार असून तुमच्या त्वचेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावा. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर प्रायमर (Primer) लावा याने तुमच्या चेहऱ्यावर मेकअप व्यवस्थित बसतो. त्यानंतर तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे साजेस अस फाउंडेशन (Foundation) लावा.

कन्सीलर (Concealer)

बेस मेकअप झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील कोणतेही डाग तुम्हाला लपवायचे असल्यास तुम्ही कन्सीलरचा वापर करू शकता. अनेकदा असे होते की कोणत्याही सणाच्या ऐनवेळीस आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अथवा डाग येतात. पण ते कन्सीलर च्या साहाय्याने ते डाग तुम्ही लपवू शकता.

आय मेकअप (Eye makeup)

वटसावित्रीच्या पूजेसाठी तुम्हाला मराठमोळा लूक करायचा असेल तर तुम्ही काजळ, आयलायनर (Eye Liner), आय शॅडो (Eye Shadow) वापरून तुम्ही डोळ्यांना मेकअप करू शकता.

लीप (Lips)

तुम्ही तुमच्या साडीवर सूट होणारी अशी लाल रंगाची लिपस्टिक लावा.

नऊवारी साडी (Nauvari saree)

वटपौर्णिमेच्या खास पूजेसाठी तुम्ही नऊवारी साडी नेसण्यावर प्राधान्य दिले पाहिजे. मराठमोळा लूक हा नऊवारी साडीशिवाय अपूर्णच आहे. म्हणूच या दिवशी तुम्ही नऊवारी सफाई नेसण्यास प्राधान्य द्या.

दागदागिने व बिंदी (Jewelery and Bindi)

तुमच्या साडीवर उठून दिसणारे दागदागिने तुम्ही परिधान करावे. मंगळसूत्रासोबत छानसा एखादा नेकलेस त्याचबरोबर हातात तुमच्या साडीला मॅचिंग (Maching) अश्या बांगड्या घाला. नऊवारी साडीवर तुम्ही चंद्रकोर लावून अधिक सुंदर दिसू शकता. चंद्रकोरच्या खाली सौभाग्याचे प्रतीक असलेले कुंकू देखील तुम्ही लावू शकता.

हेअरस्टाईल (Hairstyle)

नऊवारी साडीवर तुम्ही केसांचा आंबाडा घालू शकता. आंबाड्यावर तुम्ही छानसा गाजर लावू शकता. याने तुमचे सौंदर्य अजूनच खुलून दिसेल.

हे ही वाचा:

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss