spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Vidhansabha Election: मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क

Vidhansabha Election 2024:महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४‘ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावीयासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दलनागरी संरक्षण दलकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलराज्य सशस्त्र पोलीस दलराज्य राखीव पोलीस दलाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ. आय. आर. (FIR) दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.

एफ आय आर‘ बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

१) मुंबई शहर व मुंबई उपनगर :  ३६

२) ठाणे : ३८

३) पालघर : ०५

४) नाशिक : ४९

५) धुळे : ०१

६) बीड : १८

७) अहिल्यानगर : ३२

८) पुणे : ४८

९) छत्रपती संभाजीनगर : २५

१०) जालना : १०

११) जळगाव : १०

१२) नंदुरबार : ०३

१३) कोल्हापूर : २६

१४) रत्नागिरी : १०

१५) सिंधुदुर्ग : ००

१६) सातारा : १५

१७) सांगली : ०८

१८) सोलापूर : २८

१९) लातूर : १२

२०) धाराशिव : ०६

२१) रायगड : १९

२२) परभणी : ०७

२३) नांदेड : १५

२४) हिंगोली : १२

२५) यवतमाळ : ०७

२६) वाशिम: ०३

२७) वर्धा : ०६

२८) अमरावती : १७

२९) अकोला : ०२

३०) बुलढाणा : ०८

३१) चंद्रपूर : ०३

३२) गडचिरोली : ०६

३३) भंडारा : १५

३४) गोंदिया : ०३

३५) नागपूर : २९

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss