वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या राजीनाम्यची मागणी होत आहे. दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेला २३ दिवस होऊन देखील अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे याच प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले आहेत. घटनेच्या २२ व्या दिवशी तो सीआयडीला शरण आला. दरम्यान वाल्मिक कारड यांच्या जवळीकतेमुळे आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे, विरोधकांकडून मुंडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकुष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन. घेतलं त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी मंत्री धनंजय मुडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एस आय टी चा अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बद्दल निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे, यावर देखील विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून कोणीही नाराज नाहीये, जल संपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही या खात्यात काम करण्यास खूप वाव आहे, नदी जोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात काम करण्यास चांगला वाव आहे, असंही यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका