spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

माजी आमदार Bachchu Kadu यांच्या नेतृत्वात वाडा आंदोलनाला सुरुवात

अमरावतीत माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मैदानापासून वाडा आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

अमरावतीत माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मैदानापासून वाडा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत धनगर बांधव, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासह शेळ्या, मेंढ्या व घोडे ही मोर्चात सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या, मेंढपाळ, धनगर बांधवाच्या समस्या सोडवा, दिव्यांगाना सम्मानजनक मानधन द्या, शेतमजूरांना न्याय द्या यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक होत हे आंदोलन पुकारले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन धडकणार आहे. कर्जमाफी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पण कोणते कर्ज माफ करणार, कुठल्या वर्षातील करणार, अर्धे करणार की पूर्ण करणार याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तीन महिने वसूली आणि कर्ज भरण्याचे असतात. जेव्हा शेतकऱ्यांकडे कर्ज मागण्यासाठी बॅंकवाले जातात तेव्हा ते त्यांना सांगतात की देवेंद्र फडणवीस यांनी तर घोषणा केली होती की कर्जमाफी करणार. यामुळे शेतकरी आणि बॅंकवाले दोघे अडचणीत येणार आहेत. ३१ मार्चच्या आत कर्ज भरले नाही तर हिंदू शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे हिंदुत्ववादी सरकार आहे.  तरी यात हिंदू शेतकरी मरत असेल तर करायचे काय यासाठी हे आंदोलन आहे. टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ आणि शांततेत आंदोलन करु, सरकारने यात राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजूरी

आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss