Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलच तापलं आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचेही आरोप आहेत. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातचं आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असे देखील धनंजय देशमुख म्हणाले.नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया
वाल्मिक कराड हे मराठवाडा भागातील बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबाशी जवळचे म्हणून ओळखले जातात. मुंडेंचे मूळस्थान असलेल्या परळीमध्ये ते अनेक मुद्द्यांवर निर्णय घेतात. तथापि, ९ डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येत नाव आल्यानंतर कराड फरार झाले. कराडवर हत्येचा गुन्हा दाखल नाही, परंतु तो अवादा ग्रुप या प्रमुख अक्षय ऊर्जा कंपनीकडून २ कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात आरोपी आहे. कराड हे परळी तहसीलमधील पांगरी गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचा जन्म एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
वाल्मिक कराड व त्याच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. “इतकी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ इतक्या बेक्कार घटनेमधल्या आरोपींना दिली जात असेल, तर लोकांना जेलमध्येच राहावं वाटेल. त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या सोबतच्या बॅग देणे, त्यांना मटण पुरवल्याचे देखील पुरावे आहेत. हे पुरावे वेळेसहीत आहेत. यात पोलिस देखील सामील असल्याचा संशय आहे. याची चौकशी करून यातील पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले आहे. एखाद्या आरोपीला तुरुंगात कोर्टाच्या परवानगी शिवाय कोणतेही सवलती दिल्या जात नाहीत पण कराड यांच्या साठी हे नियम वाकवले जातायेत का?
वाल्मीक कराडला VIP सेवा नकोच असं निलेश लंके यांनी देखील म्हटलेलं आहे. VIP सेवा देणाऱ्यांवर कारवाई करा अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा देशमुख कुटुंबीय करत आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात कपडे बदलण्यासाठी कपड्यांची बॅग दिली जाते. जेवणासाठी मटन देणे, वेळेवर चहा आणून देणे. यांसारख्या सर्व सोयी वाल्मिक कराड यांना तुरुंगात मिळत असल्याचा म्हटलं जात आहे.
दरम्यान परळी दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केल्यामुळे धनंजय मुंडे समर्थकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना आरोपी केलं जात नाही का? असा सवालही जरांगेंनी केलाय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता 2 महिने झालेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात येऊन ही त्याला तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत आहे.