Saturday, June 3, 2023

Latest Posts

HSC चा निकाल पाहायचा? घ्या या स्टेप्स जाणून

आज दिवभरातील सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांचे पाल हे बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.

आज दिवभरातील सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांचे पाल हे बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अश्यातच उद्या दिनांक २५ मे रोजी दुपारी २ वाजता बारावीचा निकाल हा जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. तसेच उद्या दुपारी २ वाजल्यानंतर हा निकाल सर्वांना बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदाच्या वर्षी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.

तसेच उद्या हा निकाल जाहीर झाल्यनानंतर दिनांक २६ मे पासून दिनांक ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

http://Maharesult.nic.in

http://hsc.maharesult.org.in

http://hscresult.mkcl.org

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? –

 • महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 • अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.
 • होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.HSC Board Examination
 • तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? 

 • महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
 • बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
 • तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
 • तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
 • एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
 • निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMSद्वारे निकाल कसा पाहाल..?

 • तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.
 • तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
 • 57766 वर मेसेज सेंड करा.
 • तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल

हे ही वाचा:

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss