Saturday, April 20, 2024

Latest Posts

कार विकायची आहे? जाणून घ्या कार विकायचा perfect time

अनेकजणांना आपली कार (Car) प्रिय असते. प्रत्येकाच्या त्या गाडीसोबत खास आठवणी असतात. काही जणांनी स्वतःच्या कष्टाच्या कमाईने ती गाडी विकत घेतली असते तर काही जणांना त्यांच्या प्रिय व्यक्तींकडून ती गाडी भेट म्हणून मिळाली असते.

अनेकजणांना आपली कार (Car) प्रिय असते. प्रत्येकाच्या त्या गाडीसोबत खास आठवणी असतात. काही जणांनी स्वतःच्या कष्टाच्या कमाईने ती गाडी विकत घेतली असते तर काही जणांना त्यांच्या प्रिय व्यक्तींकडून ती गाडी भेट म्हणून मिळाली असते. परंतु कोणत्याही गोष्टीचे अथवा वस्तूचे आयुष्य हे फार काळासाठी नसते. तसेच गाडीचेही आहे. तुम्ही जरी तुमच्या गाडीची काळजी अगदी काटेकोरपणे घेत असाल तरी कालांतराने तुम्ही विकत घेतलेल्या गाडीमध्ये बिघाड होतो. गाडीमध्ये बिघाड झाल्यास गाडी दुरुस्त केली तरी सारखाच बिघाड होत राहतो. त्यामुळे गाडी दुरुस्त करण्यासाठी आपल्या खिश्यातुन पैसे देखील भरपूर जातात. त्यामुळे कालांतराने आपल्या गाडीचा वापर करणे शक्य होत नाही. म्हणूनच गाडी विकण्याखेरीस आपल्याकडे कोणताहीपर्याय उपलब्ध होत नाही. अनेकजण हे घाईगडबडीत आपली गाडी इतरांना विकून मोकळे होतात. पण तुम्हाला माहित आहे का योग्य वेळी कार विकल्यास आपल्या पैशाची बचत होते व आपल्याला योग्य ती किंमत मिळते. चला तर मग जाणून घेऊया कार विकण्याची योग्य पद्धत

बाजारात कारचे पार्टस महाग होतात अथवा उपलब्ध होत नाही:

एखाद्या कंपनीच्या कारचे मॉडेल जुने होते तेव्हा ती कंपनी त्या कारच्या निर्मितीचे प्रमाण कमी करते. कारचे नवनवीन मॉडेल्स हे बाजारात येतच असतात त्यामुळे जुन्या कारची मागणी कमी होत जाते त्यामुळे कंपन्या त्या जुन्या कारच्या मॉडेल्सची निर्मिती करण्यावर जास्त भर देत नाही. यामुळे काहीवेळेस जुन्या झालेल्या कार्सचे वेगवेगळे पार्टस बाजारात मिळत नाही अथवा महाग होतात अशावेळी तुम्ही गाडी विकायचा विचार करायला हवा.

कारने १,००,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले:

प्रत्येक गाडीची अंतरकापण्याची विविध कार्यक्षमता असते. गाडी जेव्हा ते अंतर पार करते तेव्हा तिची मर्यादा कमी होत जाते. प्रत्येक गाडीची अंतर कापण्याची कार्यक्षमता हि कारच्या निर्माती कंपनी त्याचबरोबर मॉडेलवर अवलंबून असते. साधारण बहुतांश गाड्यांची मर्यादा ही १,००,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केल्यांनतर कमी होते. तुमच्या गाडीने जर हे अंतर पार केले असेल तर तुम्ही गाडी विकण्याचा विचार करू शकता.

मूल्य कमी होण्याचा घटक लक्षात घ्या

एखाद्या कारचे मूल्य कालांतराने कमी होत जाते. तुमची गाडी जेवढी जुनी होत जाते तेवढे त्या गाडीचे मूल्य कमी होत जाते. म्हणूनच तुम्ही जेव्हा कार विकायचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्व बाजूनी विचार करावा लागेल. गाडीच्या मूल्याबाबत विचार करणे देखील अनिवार्य आहे. तुमच्या गाडीचे मूल्य किती आहे, ते किती कमी झाले आहे याबाबर सारासार विचार करणे आवश्यक आहे.

कंपनीने कारच्या मॉडेलची निर्मिती बंद केली:

एखाद्या ऑटोमोबाईल (Automobile) कंपनीने कारच्या मॉडेलची निर्मिती बंद केली तर त्या कारची किंमत कमी होते. किमतीसोबत मागणी देखील घसरते. अशावेळी तुम्ही गाडी लवकर विकली पाहिजे.

हे ही वाचा : 

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss