Thursday, March 28, 2024

Latest Posts

Watch Video : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार

अंबरनाथमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या वादातून(bullock cart race dispute) अंबरनाथमध्ये (Ambernath) तुफान राडा झाला आहे.

अंबरनाथमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या वादातून(bullock cart race dispute) अंबरनाथमध्ये (Ambernath) तुफान राडा झाला आहे. हा वाद इतका पेटला की थेट गोळीबारापर्यंत पोहचला. अंबरनाथमध्ये दोन गटात अंधाधुंद गोळीबार (Indiscriminate firing) देखील झाल्याचे समजते. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडके गट आणि राहुल पाटील गटाचे शाब्दिक वाद झाले त्यानंतर मात्र फडके गटाने रागाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. कल्याण अडवली गावातील रहिवासी राहुल पाटील हे आपल्या कारने एमआयडीसी परिसरातून जात असताना त्यांच्या कारवर बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्या समर्थकांनी विटा आणि दगडांनी हल्ला केला. यावेळी दोन्ही गटाकडून १० ते १२ राउंड फायर करण्यात आले. मात्र, या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करतात. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झाली नसल्याचे समजते.

अंबरनाथमध्ये दोन गटात अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक जमा झालेले असतानाच अंदाधूंद गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली, ही घटना अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ घडली आहे. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ही घटना घडताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ही परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न केला. फडके गटाने पंधरा ते वीस वेळा गोळ्या झाडण्यात आल्याने पोलीस कसून चोकशी करीत होते.

हे ही वाचा : 

Mukesh Ambani Liverpool: इंग्लंडच्या ‘या’ महागड्या क्लबवर मुकेश अंबानींची नजर, आता परदेशातही वाजणार भारताचा डंका

आदित्य ठाकरेंच्या कुंडलीत मुख्यमंत्री बनण्याचे योग – ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss