Friday, March 29, 2024

Latest Posts

Western Railway ची भन्नाट आईडिया, चक्क मिनी पवनचक्क्यां द्वारे केली वीज निर्मिती!

शहरातील कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने (Western Railway), प्रथमच पवन ऊर्जेद्वारे वीज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

शहरातील कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने (Western Railway), प्रथमच पवन ऊर्जेद्वारे वीज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच पश्चिम रेल्वेने खार आणि नायगाव या रेल्वे स्थानकाशेजारी मिनी पवनचक्क्या बसवल्या आहेत. या मिनी पवनचक्क्या म्हणजेच ‘विंड टरबाइनसं’ शेजारून क्रॉस होणाऱ्या लोकलच्या वाऱ्या मुळे फिरणार आहेत. यामुळेच या पवनचक्क्यांमध्ये विद्युत निर्मित होणार आहे.

“आम्ही मिनीपवन चक्क्या सुरु केल्या आहेत, ज्या रेल्वे रुळांशेजरी आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या लोकल्स च्या वाऱ्यामुले या पवनचक्क्यां मध्ये विद्द्युत निर्मिती होणार आहे”, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच या विद्युत प्रकल्पाचे पावसाळ्यात विविध चाचणीच्या आधारे परीक्षण सुद्धा केले जाईल. अशी ही माहिती पश्चिम रेल्वे च्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ट्रेन ही ५० ते १०० किमी प्रति तास वेगाने धावत असते, त्यामुळे या धावत्या लोकलमुळे प्रचंड वाऱ्याची निर्मिती होते आणि निर्माण होणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे ‘विंड टरबाइन’चे म्हणजेच पवन चक्क्यांचे ब्लेड फिरले जातात. या फिरत्या मिनी पवनचक्क्यांद्वारे तब्बल १ किलोवॅट ते १० किलोवॅटपर्यंत वीज निर्माण होऊ शकते. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर या पवनचक्क्या अनेक स्थानकावर तसेच रुळां वर स्थापित केल्या जातील. कालांतराने पवनचक्क्यां पासून निर्माण झालेली ऊर्जा मुख्य ग्रीडमध्ये प्रसारित केली जाऊ शकते.

सध्या च्या काळात सर्वात जास्त विजेचा वापर हा रेल्वे स्थानकांवर केला जातो. या पवनचक्क्यांमुळे विजेचा भार कमी होत असून प्रवाशांनी सुद्धा या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. तसेच अनेक रेल्वे स्थानकांवर हा प्रकल्प बसवण्याची मागणी रेल्वे प्रवाश्यांकडून होत आहे

हे ही वाचा : 

Thane मध्ये पुन्हा वाद!, शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले?

समीर वानखेडेंनी सादर केले शाहरुख सोबतचे संभाषण, “माझ्या मुलाची काळजी घे”

Ayushmann Khurrana च्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन, शोक अनावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss