spot_img
Sunday, January 12, 2025

Latest Posts

शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय घेणार? कृषी खातं मिळताच मंत्री manikrao kokate यांनी सांगितले.

नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे लासलगाव दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली . मंत्रिमंडळाचा विस्तारनंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे. खातं जाहीर होता सर्व खात्याचे मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. त्यावेळी राज्यचं कुषीमंत्रिपद हे महायुतीमध्ये राष्टवादी अजित पवार गटाला देण्यात आलं आहे माणिकराव कोकाटे हे राज्याचे नवे कूषीमंत्री आहेत. आज माणिकराव कोकाटे हे लासलगाव दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी आपल्या कामाची पुढील दिशा स्पष्ट केली.

नेमके कृषीमंत्री झाल्यानंतर पहिला दौरा आहे, आमचे मित्र कल्याणराव यांच्या घरी आलो आहे. शेतकऱ्यांना प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मागणी केली होती माझ्या वाट्याला आता कृषी खाते आले आहे. कृषी खातं हे जबाबदारीचं खातं असून तो काटेरी मुकुट आहे. अवकाळी पाऊस, बाजरभाव असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल, शेतीच्याक्षेत्रात कायम जे प्रश्न निर्माण होत असतात त्यावर निर्णय घेतले जातील, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विम्याच्या संदर्भात कोणी गैरफायदा घेतला तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहेत. ओला दुष्काळ पडला असेल तर त्यावर निर्णय येत्या काळात घेऊ. युती सरकार भक्कम आहे. मी कोणाच्या विरोधामुळे लासलगावला आलो नाही तर माझा लासलगावशी जुना संबंध आहे. मी जे बोलतो तेच करतो, मी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर योग्य ते निर्णय घेईल. तसेच एकीकडे यावेळी राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं मात्र दुसरीकडे छगन भुजबळ यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट करण्यात आला आहे. मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे भुजबळ नाराज आहेत, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी जे बॅनर लावण्यात आले होते, त्यावरून देखील भुजबळांचा फोटो गायब होता, भुजबळांऐवजी त्यांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या कांदे यांचा फोटो होता, यावरून देखील चर्चेला चांगलंच उधाण आलं.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss