मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची शेती करणारा तो कुणबी (Kunbi) ही मांडणी खरी असल्याचे जुन्या कागदपत्रांच्या नोंदीतून दिसून येत आहे. शेती करणारी जमता म्हणजे कुणबी अशी साधी व्याख्या या समाजाची आहे. मागील काही दिवसांपासून कुणबी मराठ्यांना आरक्षण (Reservation) देण्यासाठी पुरावे तपासले जातायत. कुणबी मराठा असलेलेल्या नोंदींच्या कागदपत्रांची शोधाशोध सध्या सुरु करण्यात आलीये. पण त्यातच आता लिंगायत, साळी, माळी, कोळी, मुस्लिम, धनगर, मारवाडी, यलम यांसारख्या अनेक जातींमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या जातीचे लोकही शेती करतात. पण या जातीतील लोकांना आरक्षण नाही. त्यामुळे कुणबी नोंदींच्या आधारे या जातीतील लोकांनी देखील आरक्षण मागितले तर काय हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.
मराठा कुणबी यांसारखंच मारवाडी कुणबी, यलम कुणबी, लिंगायत कुणबी या प्रकारे उल्लेख असलेल्या मराठ्यांशिवाय इतर जातीची देखील कागदपत्र देखील सापडतायत. एकट्या लातूर जिल्ह्यात या नोंदी सापडल्यात. काँग्रेस पक्षाचे माजी महापौर विक्रम गोजमगुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
मराठा समाजाच्या 19 हजार कुणबी नोंदी
मनोज जरांगे यांनी मराठा समाज हा शेती करणारा असल्याचं म्हटलं. तसेच शेती करणारा म्हणजेच कुणबी समाज अशी मांडणी देखील त्यांनी केली. त्यानुसार राज्य सरकारकडून सुरु असलेलेल्या कुणबी नोंदींच्या तपासात मराठवाड्यात एकूण 19 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. दरम्यान या नोंदी जुन्याच असल्याचं कागदपत्रांच्या नोंदीतून दिसून आलंय. त्यामुळे आता मराठा समाजाच्या नोंदी तपासल्या जात आहे. पण या नोंदी तपासात असतानाच मारवाडी, लिंगायत, साळी, माळी, कोळी, मुस्लिम, धनगर, यलम यांसारख्या काही जातींच्या नोंदीत देखील कुणबी असल्याचं समोर आलंय.
‘या’ लोकांना आधीच आरक्षणाचा लाभ
नव्या कुणबी नोंदी सापडल्यांपैकी धनगर, माळी, येलम यांना आधीच आरक्षणाचा लाभ मिळ आहे. पण यामध्ये मारवाडी, लिंगायत याही नोंदी सापडल्यात. परंतु या जातींना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. मनोज जरांगे यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर ज्यांना कुणबी नोंदी आहेत, अशा सर्वांना आरक्षणाचा लाभ द्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी घेतली.
गुरूवारी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांची संभाजीनगर मध्ये बैठक झाली. या बैठकीमध्येही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मराठासह इतर काही जातीतही त्यांचा व्यवसाय शेती असल्याने कुणबी नोंदी समोर येत आहेत. कागदोपत्री अनेक जातींचा उल्लेखही करण्यात आलाय. मारवाडी किंवा लिंगायत अश्या जात समुहाने कुणबी नोंदी आधारे आरक्षण मागितले तर काय असा प्रश्न विक्रम गोजमगुंडे यांना पडला आहे. तर याच पार्श्वभूमीवर पुढेही चर्चा होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता राज्य सरकार या मुद्द्यावर तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हे ही वाचा :
दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स
आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…