Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे काम आणि नवीन कल्पनांसाठी कायमच ओळखले जातात आणि हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. ते कायमच वेगळा विचार करुन नवनवीन प्रकल्प राबवत असतात. नितीन गडकरी यांनी आता मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यांच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) ला मोठा फायदा झाला आहे. NHAI ला १२०० कोटींचा नफा झाला आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने माहिती देत सांगितले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चालू आर्थिक वर्षात ५६,००० हजार कोटी रुपयांचे कर्ज प्रीपे केले. (NHAI) च्या अंदाजे १२०० रुपयांच्या व्याज खर्चात बचत झाली असे सांगण्यात आले. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला(NHAI) चे एकूण खर्च ३.३५ लाख कोटी रुपये होते. २०२४-२५ च्या शेवटच्या अखेरीस ते सुमारे २.७६ लाख कोटी रुपयांवर येईल त्यातच NHAI आपल्या कर्जाचा बोजा कमी करत आहे.
प्रीपे म्हणजे काय?
प्रीपे (Prepay) म्हणजे “पूर्वभरणा” किंवा “पूर्वभरण” याचा अर्थ असतो. साधारणपणे, प्रीपे हा शब्द व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील एक संज्ञा आहे, ज्यामध्ये ग्राहकाला सेवा किंवा उत्पादकांची खरेदी करण्यापूर्वी त्यासाठी संपूर्ण किंवा भाग-भाग रक्कम अदा करावी लागते. याचा वापर विविध प्रकारे होत. प्रीपे सिस्टीम ग्राहकाला त्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता देते. यामध्ये अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता कमी असते. काही प्रीपेड कार्ड किंवा सेवा उचलल्यामुळे ग्राहकांना उधारीच्या भोकात अडकण्याचा धोका कमी होतो.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षात ५६,००० कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले होते. त्यामुळे नहीचे १,२०० कोटी रुपयांचे व्याज वाचले. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितनुसार, एनएचएआयवर ३.३५ लाख कोटी रुपये कर्ज होते. २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ते कर्ज २.७६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. एनएचएआय आपले कर्ज कमी करण्यात यशस्वी ठरली आहे. तिमाहीत ते कर्ज २.७६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. एनएचएआय आपले कर्ज कमी करण्यात यशस्वी ठरली आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?