काल वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी मकोका कायदा लावण्यात आला. यामुळे परळी मधील वातारण चांगलेच तापले आहे. काल वाल्मिक कराड यांची आई व पत्नी यांनी पोलीस ठाण्याबागेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी आज धनंजय मुंडे परळीत भेटायला गेले होते. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.
वाल्मिक कराडच्या कुटुबीयांना भेटायला गेलेल्या धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांच्या घरी जायला वेळ मिळाला नाही, धनंजय मुंडे यांनी परळीत आल्यानंतर वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यावरून मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “चांगलं काम केलं त्यांनी. मंत्रिपदाचा फायदा घेत आहेत. संतोष भैय्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी. संतोष भैय्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीवरून हात फिरवायला तुला वेळ मिळाला नाही का? या सगळ्यामागे याचाच हात आहे का असा संशय आता आम्हाला येतोय? असं म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे, संतोष भैयांचा क्रूरपणे खून करायचा आणि तो व्हिडीओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा, अशा आरोपींसाठी तुम्ही आंदोलन करताय. त्याला पाठिंबा देताय. आता धनंजय मुंडेंच्या टोळीने ही नवीन पद्धत पाडल्याचा आरोप मनोज जरांगे तसेच सुरेश धस यांनी देखील केला आहे. आम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागायचा नाही का? की तुमच्यासारखे आरोपीच्या मागे उभे राहायच? असा सवालही जरांगे यांनी उपस्तिथ केला आहे.
पुढे, मनोज जरांगे म्हणाले की, “मुख्यमंत्र्याकडे आमची मागणी आहे की खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, यातून कुणीही सुटता कामा नये. आरोपी ज्याच्या घरी राहिले त्याला सुद्धा आरोपी करायला पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे काय होणार? आम्ही त्यापेक्षा दहापट आंदोलन बीडमध्ये उभं करू? आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या टोळीचा संपूर्ण नायनाट करायला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटता कामा नये, नाहीतर मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या नावाला डाग लागेल असंही मनोज जरांगे म्हणाले.
हे ही वाचा:
परळी बंद वर Suresh Dhas यांची प्रतिक्रिया- आरोपीसाठी शहर बंद ठेवायचं, आरडाओरडा करायचा हा नवीन पॅटर्न