सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार(Pratibha Pawar) यांना बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवण्यात आलं होतं. त्यांना अर्धा तासानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसमधून ही माहिती देण्यात आली आहे.
प्रतिभा पवार म्हणाल्या की, “तुम्ही गेट बंद का केला? आम्हाला पाहून गेट बंद केलं का? तुम्हाला कुठून फोन आला? कोणाचा फोन आला? आतमध्ये सगळं सुरु आहे की बंद आहे? आतमध्ये सगळं सुरु आहे तर मग अडवत का आहात? आम्ही चोरी करायला थोडीच आलो आहोत. आम्हाला इथे खरेदी करायची आहे. ज्यांनी बंद करायला सांगितले आहे, त्यांना सांगा आम्हाला खरेदी करायची आहे.”
या सर्व प्रकारावर आईला अडवल्यानंतर सुप्रिया सुळेही संतापल्या आणि म्हणाल्या, माझी आई प्रतिभा पवार माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीतल्या टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभा केलं त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जातं. आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रतिभा पवार यांना बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटमधून आत सोडण्यात आले आहे. सीएओचा फोन आल्याने मी गेट बंद केलं असल्याचे सुरक्षारक्षकाने यावेळी बोलताना दिलं आहे.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.