मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यभर आंदोलने सुरू असताना आता मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीबाबत गंभीर बाब समोर आली आहे. उच्चशिक्षणाकरिता परदेशात जाण्यासाठी सारथीमार्फत ७५ मराठा विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
मात्र, या योजनेला विविध प्रशासकीय कारणांनी होत असलेल्या विलंबामुळे यंदा मराठा विद्यार्थी परदेशात जाणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव आठ महिने मंत्रालयात धुळखात होता, मग राज्यशासनाने परिपत्रक काढायला उशीर केला. त्यानंतर अर्ज प्रक्रियेसाठी सारथीने महिनाभराचा कालावधी घेतला. आता परदेशातील विद्यापीठे सुरू होऊन दोन महिने झालीत तरीही विद्यार्थी येथेच आहेत.
मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यभर आंदोल सुरू असताना आता मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीबाबत गंभीर बाब समोर आली आहे. उच्चशिक्षणाकरिता परदेशात जाण्यासाठी सारथीमार्फत पंचाहत्तर ७५ मराठा विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मुळातच उच्चशिक्षणास परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्ज संख्या पंचाहत्तर ७५ असून यासाठी केवळ पंचांशी ८५ अर्ज आले आहेत . शासनाने अर्जदारांना जाचक अटी लावल्याने केवळ ५० टक्के विद्यार्थी पात्र ठरु शकले आहेत . शासनाने सारथीच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी २५ कोटींची तरतूद केली. मात्र त्याचा लाभ केवळ २५ विद्यार्थीच घेऊ शकणार असल्याने २५ कोटींचा निधी पडून राहणार, असा आरोप स्टुडंट हेल्पींग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
.