spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका?, जाणून घ्या संपूर्ण यादी…, धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल

राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार असे यश मिळाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार असे यश मिळाले आहे. हे यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी निराशा पत्करावी लागली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष बळकट होत चालले आहेत.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांच्या निवडीस आव्हान देत अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. या निवडणूक याचिका दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. आता कोणी कोणाविरुद्ध याचिका दाखल केली, याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. या याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका..?
  • छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध राजू शिंदे
  • परळीतून विजय झालेले धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे
  • आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध मेहबूब शेख
  • घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांच्या विरुद्ध राजेश टोपे
  • बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याविरुद्ध बबलू चौधरी
  • भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्याविरुद्ध चंद्रकांत दानवे
  • परंडाचे आमदार तानाजी सावंत यांच्याविरुद्ध राहुल मोटे
  • जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल
  • लातूरचे आमदार रमेश कराड यांचे विरुद्ध सर्जेराव मोरे
  • केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याविरुद्ध पृथ्वीराज साठे
  • उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्याविरुद्ध सुधाकर भालेराव
  • वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्याविरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर
  • अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याविरुद्ध विनायकराव पाटील
  • धुळे जिल्ह्यातील सक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्याविरुद्ध प्रवीण चौरे
  • पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांच्याविरुद्ध सतीश पाटील
  • अहिल्यानगर जिल्ह्यातूनही आठ याचिका दाखल करण्यात आले आहेत
  • संगमनेरचे आमदार अमोल खटाव यांच्याविरुद्ध बाळासाहेब थोरात
  • कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदे
  • अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध अभिषेक कळमकर
  • शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध प्रताप ढाकणे
  • राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध प्राजक्ता तनपुरे
  • अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांच्याविरुद्ध अमित भांगरे
  • पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्याविरुद्ध राणी लंके
  • कोपरगाव चे आमदार अशुतोष काळे यांचे विरुद्ध संदीप वरपे

यात आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार तानाजी सावंत, आमदार मंजुळा गावित, आमदार रोहित पवार यांसह अनेक आमदारांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली आहे. तर मेहबूब शेख यांनी आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांच्याविरुद्ध राजेश टोपेंनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान आता या याचिकांवर काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यावर काय निर्णय देते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजूरी

आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss