spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

संतोष देशमुख हत्याप्रकरणात नियुक्त करण्यात आलेले सरकारी वकील उज्वल निकम नेमके कोण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला. राज्याचे आणि राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले आहे. 9 डिसेंबरला हि निर्घृण हत्या झाली होती. या हत्याला २ महिने उलटले असून अद्याप १ आरोपी फरार आहे. या प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली असून मकोका कायदा लावण्यात आला आहे. आरोपी वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्येचा गुन्ह्यात नाही तर आवदा कंपनीच्या खंडणीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधक धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मराठा आरक्षन आंदोलन मनोज जरांगे पाटील, भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकारत अंजली दमानिया, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधक सतत मोर्चे,आंदोलन, उपोषण करत आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून तपासाचे आदेश दिले होते. मात्र २ महिने उलटले असून अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही. आरोपींना अद्यापही शिक्षा मिळाली नाही आहे. आता या हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर कोण आहेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम? बघुयात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी लावून धरण्यात आली होती. या मागणीला अखेर यश आले आहे.

उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले वकील आहेत. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासारख्या महत्त्वाचे खटले लढवले आहेत. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला, प्रमोद महाजन खून खटला आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली. २०१३ च्या मुंबई सामूहिक बलात्कार खटल्यात, २०१६ च्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात ते विशेष सरकारी वकीलही होते. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी राज्याच्या वतीने युक्तिवाद केला. मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात उज्ज्वल निकम यांचे महत्त्वाचे योगदान होते.

२०१६ मध्ये भारत सरकारने निकम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना Z+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, जी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सुरक्षा आहे. निकम यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे मराठी पालकांच्या घरात झाला. त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते आणि आई गृहिणी होती. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी जळगाव येथील केसीई सोसायटीच्या एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांचा मुलगा अनिकेत हा देखील मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी वकील आहे. निकम यांनी जळगावमध्ये जिल्हा सरकारी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खटले चालवले. ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ६२८ जन्मठेपेची शिक्षा आणि ३७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

त्यामुळे उज्ज्वल निकम हे हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात. उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर संसदीय निवडणूक लढवली आहे. त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उभे झाले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांना संसदीय निवडणूक लढवावी लागली म्हणून सुमारे २५ प्रकरणांमध्ये एसपीपी पदाचा राजीनामा दिला होता.

Latest Posts

Don't Miss