Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेमध्ये मोठया राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण व्हावा आणि संघटनात्मक बांधणी व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी तीन दिवसाचा नाशिक दौरा आयोजित केला होता. पण पक्षात निराशाजनक स्थिती असल्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईसाठी रवाना झाले. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतल्याचंही सांगितलं जात आहे.
मुंबईच्या दिशेने राज ठाकरेंची गाडी का फिरली?
राज्यातील महापालिका निवडणुकांचे संकेत मिळताच सर्व सत्ताधाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे, त्यातच मनसेनेही जोरदार सुरुवात केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर फिरून पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि याचाच भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक तीन दिवसीय दौऱ्यासाठी निघाले होते. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणं, महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन काही सूचना करणं हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, राज ठाकरे यांना नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना व्हावे लागले. काल (२३ जानेवारी) रोजी पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाल्यानंतर आज २४ जानेवारीला दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून पक्षात निराशा जनक स्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त होणार असून त्याजागी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या काळाच्या झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना खडसावले तर नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा :