बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला तब्बल ५० दिवस उलटून गेले. तरी सुद्धा आरोपी फरार आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरही विरोधकांकडून अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार टिका करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात दररोज पुरावे मिळत आहेत, अजून कोणते पुरावे हवे आहेत? अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. मी त्या ठिकाणी असती तर राजीनामा दिला असता, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बीड जिल्ह्यातील खंडणीखोर वाल्मीक कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पवनचक्की खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने सरकार काय करत आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे
पुढे खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच पक्षांकडून केली जात आहे.अगदी अजित पवार यांच्या पक्षातून देखील ही मागणी केली जात आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी करत नाही असा कोणताही पक्ष नाही. नैतिकतेच्या जोरावर राजीनामा मागितला जात आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये मागणी केली जात आहे. रोज नवीन पुरावे सादर केले जात आहेत,” असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
परराज्य आपल्या पुढे जाऊ लागली
जी गोष्ट मी गेली, अडीच वर्ष जे सांगत होते, ते आज निती आयोगाने मान्य केलं आहे. आलेला पैसा, आम्ही खर्च केलेला पैसा यातील अंतर किती? याला फिसकल डेफीसीएट ॲक्ट आपल्याकडे आहे, जो अटलजींनी आणला होता. एखादे राज्य कितीही पैसे खर्च करू शकत नाही. ते दिवाळखोरीकडे जाऊ शकत नाही. आपण वित्तीय तुटीमध्ये ३ वरून ६ व्या राज्यावर गेलो आहोत. ओडीसा आणि छत्तीसगड हे आपल्या पुढे गेले असल्याचा टोला त्यांनी लगावला. इतर राज्य पुढे जात आहे, पण महाराष्ट्र का मागे जात आहे? याचा विचार केला गेला पाहिजे,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis