Friday, December 1, 2023

Latest Posts

राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना बैठकीला का बोलावलं नाही? – बाळा नांदगावकर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी करत बाळा नांदगावकर म्हणाले

मराठा आरक्षणाच्या विषयावर मंथन व्हायचं असेल तर सर्वपक्षीय सहकार्याची गरज होती, सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही बोलवायला पाहिजे होतं, त्यांनीही आपलं मत व्यक्त केलं असतं असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. जरांगेनी उपोषण सोडायला पाहिजे हे सर्वांना वाटतं, मात्र हा मुद्दा सामोपचाराने सोडवायला हवा असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, राज्यात सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आत्महत्येची प्रकरणं वाढवली आहे, जरांगेंच्या तब्येतीची चिंता सतावते आहे.

राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे. आमदार जरी असले तरी पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका मांडली असती मात्र तुम्ही बोलवलंच नाही. सर्वांना बोलवलं असतं तर राज ठाकरे यांनी देखील भूमिका मांडली असती. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष प्रमुखांनी देखील भूमिका मांडली असती. हा प्रश्न ज्वलंत विषय आहे, त्यामुळे सरकारनं हे बरोबर केलं नाही.

चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी करत बाळा नांदगावकर म्हणाले की, सर्वपक्षीय सहकार्य करणं गरजेचं होतं तर सर्वांनाच बोलवायला पाहिजे होतं. विचारमंथन करणं गरजेचं होतं तर ही लोक देखील येणं गरजेचं होतं. आरक्षणाला कोणी नाही म्हणत नाही, मग चार दिवसांचं अधिवेशन घ्या, त्यात आरक्षण कसं देणार हे देखील कळू द्या. सर्व पक्षीय चर्चा नंतर केंद्राला ठराव पाठवा. सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊ जा, मात्र देणार कसं हे सांगा? विशेष अधिवेशन बोलवत सर्व पक्षीयांची भूमिका येऊ द्या.

हे ही वाचा : 

WESTERN RAILWAY: ओव्हरहेड वायर तुटली, दुरुस्ती होऊनही गाड्या उशिराने

MARATHA RESERVATION: मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षांची बैठक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss