शिर्डीमधील साईबाबा हे प्रत्येकाचे आराध्य दैवत आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भजनाची व्यवस्था हि रोज करण्यात येते. अनेक भाविक या भोजनाचा लाभ घेतात. पण अश्यातच आता या भोजनावरून एका वादाला सुरुवात झाली आहे. साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरून विखे पिता-पुत्रांनी वेगवेगळी भूमिका व्यक्त केली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे म्हणतात, मोफत भोजन बंद करून साईभक्तांकडून शुल्क आकारा. तर वडील मंत्री राधाकृष्ण विखे म्हणताय, साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील. मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंदेखील राधाकृष्ण विखे पाटील यावेळी स्पष्ट करतात.
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलीय. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं. मात्र तिथे चांगले शिक्षक नाहीत. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय. याचा काय उपयोग?”, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिलाय. सुजय यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. देणगीदार साई भक्तांनी ३६५ दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलं असून याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानवर पडत नाही. साई संस्थानकडे साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही. अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे या दृष्टीने बघू नये. महाप्रसाद म्हणून भाविक साई प्रसादालयात भोजन करत असतात, असं साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी म्हटलं आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
“सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?