एकीकडे राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेच्या मोबाईलवरून मोठा गदारोळ माजला असताना दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीने चांगलाच जोर धरला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटे च्या मोबाईलमध्ये मोठे पुरावे असल्याचं सांगत हे मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. पुरावे नष्ट झाल्यास याची जबादारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. सर्व आरोपींचे रिमांड घ्या अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल करून होणार नाही. तर त्या मोबाईलमध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? धनंजय मुंडे यांनी मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन ५८ दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे मोबाईलमध्ये नेमके काय होते? याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ५ फेब्रुवारीला बीड जिल्ह्यातच असणार आहेत. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट जनतेतील कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे साठवण तलावाची पाहणी आणि शींम्पोरा ते खुंटेफळ पाईपलाईन बोगदा कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काही भाष्य करतायेत का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :