spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

वाल्मिक करद्वार ३०२ दाखल होईल का? बीडचे SP नवनीत कावतांनी दिल स्पष्ट उत्तर

सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणाने राज्यात आणि राजकारणात मोठं मोठ्या घडामोडी घडत आहे. सतत मोर्चे काढण्यात येत आहे. धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. आता आज मस्साजोग गावाच्या ग्रामस्थांकडून आणि धनंजय देशमुखांकडून गावातील टाकीवर चढून आज आंदोलन केले. यावेळी मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित होते. मराठा आंदोलक मानवोज जरंगे पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त मस्साजोग गावात पाहायला मिळाला.

यावेळी आरोपी वाल्मिक करद्वार ३०२ चा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच सीआयडी पोलिसांकडून तपासाबाबत आम्हाला माहिती दिली जात नाही, योग्य दिशेने तपास सुरु आहे का, हेही आम्हाला समजत नाही. माझ्या भावाप्रमाणेच माझ्याही जीवाला धोका आहे, मग मीच स्वतःला संपवून घेतो, असे धनंजय देशमुख यांनी म्हणत गावातील टाकीवर चढून आंदोलन केले आहे. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही गावात आले होते. पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यांना आरोपींवर ३०२ चा गुन्हा आरोपींवर करण्यात येणार का असा प्रश्न विचारलं तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.

काय म्हणालेत नवनीत कॉवत

धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाही, यासंदर्भातील कुटुंबीयांची मागणी आम्ही एसआयटीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. SIT वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून त्यांची भेट घेतील. सध्या मस्साजोग मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आमची गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे, अशा पद्धतीने आंदोलन करू नका, आपल्या न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत, असे बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी म्हटलं आहे.

वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल का, असा प्रश्नही एसपी कॉवत यांना विचारला होता. संतोष देशमुख यांच्या पत्नीने सीआयडीकडे जबाब दिला असून जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आहे, त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी बीडच्या नवीन एसपींना प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे, त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही. मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाहीत, उद्या सीआयडीचे प्रमुख येथे येणार आहेत, असे स्पष्ट शब्दात उत्तर नवनीत कॉवत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

Latest Posts

Don't Miss