spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Womens Day 2025: जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी माशांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. अनेक महिलांना वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. अशातच पुणे मेट्रोने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ऑफर दिली असून, केवळ २० रूपयांमध्ये 'वन पुणे कार्ड' देत आहे.

Womens Day 2025: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी माशांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. अनेक महिलांना वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. अशातच पुणे मेट्रोने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ऑफर दिली असून, केवळ २० रूपयांमध्ये ‘वन पुणे कार्ड’ देत आहे. ही ऑफर १ ते ८ मार्च दरम्यान सर्व महिलांना मेट्रोमध्ये प्रवास करताना मिळणार आहे. पुणे मेट्रोकडून ‘पुणे वन कार्ड’ सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी दिलेले आहे. या कार्डची किमंत ११८ रूपये असून, ते केवळ २० रूपयांमध्ये महिलांना उपलब्ध होणार आहे. या कार्डमुळे मेट्रोतील प्रवासात सवलत मिळेल.

मेट्रोत जाताना केवळ कार्ड स्वाइप केले की, आतमध्ये प्रवेश मिळतो. रिचार्ज करणे देखील सोपे आहे. सर्व मार्गांवर एकच कार्ड चालते आणि हे इको-फ्रेंडली देखील आहे. त्यामुळे महिलांनी या कार्डचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. १ ते ८ मार्च दरम्यान मेट्रोतून प्रवास करताना सोशल मीडियावर #SheMoves With Metro हा हॅशटॅग असणार आहे.पुणे मेट्रोने घेतलेल्या या निर्णयामुळे महिला प्रवासी चांगल्याच खुश झाल्यात. महिला दिनानिमित्त असलेल्या सावलीतीचा अनेक महिलांना फायदा होणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई यांनी अधोरेखित केले की गेल्या वर्षी “आई” धोरणाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, १,५०० हून अधिक महिला पर्यटकांना सवलतीचा फायदा झाला होता. या प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन, एमटीडीसीने २०२५ पर्यंत ही योजना वाढवण्याचा निर्णय घेतला. महिला पर्यटक एमटीडीसीच्या अधिकृत वेबसाइट www.mtdc.co द्वारे त्यांचे वास्तव्य बुक करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

Latest Posts

Don't Miss