अंबरनाथ मध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्व मध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर घडली. धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिच्यावर सपासप वार केले. जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिचा रस्त्यात मृत्यू झाला. हल्लेखोरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे ब्रिज वरून जात होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये काहीसा वाद झाला. त्यानंतर तरुणाने त्याच्याकडील धारधार शस्त्राने तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती तरुणी जबर जखमी झाली. रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
त्या तरुणाने हा हल्ला का केला, त्यामागील कारण काय याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी त्या हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?