spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Ankita Walawalkar : कोकण हार्टेड गर्लच्या घरी सुरु झाली लगीनघाई; लवकरचं अंकिताच शुभमंगल सावधान

Ankita Walawalkar Engagement Photos : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हीचं १३ फेब्रुवारी २०२५ रोजी साखरपुडा पार पडला असून १२ फेब्रुवारीला तिचा मेहंदी कार्यक्रम देखील झाला. अतिशय पारंपरिक पद्धतीने तिचा साखरपुडा झाला आणि त्या साखरपुड्याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अंकिताने साखरपुड्याचे फोटो ‘गोष्ट कोकणातील’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. “साखरपुडा कोकणातल्या गोड परीचा” असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. त्याचबरोबर तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
साखरपुड्यादरम्यान अंकिताने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता सेटवर प्रिंटेड जॅकेट घातलं आहे. त्यानंतरच्या विधीसाठी अंकिताने अंजिरी रंगाच्या शेडमधली साडी नेसली होती, त्यावर तिने हिरव्या रंगाचा नेकलेस परिधान केला होता. या दोन्ही लुक मध्ये अंकिता खूपच गोड दिसत होती.
अंकिताच्या साखरपुड्याला डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारने देखील हजेरी लावली होती. या साखरपुड्यातील विधीच्या आधीचा व्हिडीओ शेअर ‘मेरे यार की शादी है’ गाणं लावलं आहे. त्या व्हिडीओ मध्ये अंकिताचे आई-वडील विधीसाठी बसलेले पाहायला मिळाले. तसंच हा व्हिडीओ शेअर करत धनंजय पोवारने लिहिलं की, जाम खुश असा.
१५ फेब्रुवारीला अंकिता वालावलकरला हळद लागणार आहे. तर १६ फेब्रुवारीला अंकिता कुणालशी लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला करणार आहे. अंकिता आणि कुणाल यांचं लग्न देवबाग इथे पार पडणार आहे.

Latest Posts

Don't Miss