Ankita’s cocktail party : अंकिता आणि कुणालच्या कॉकटेल पार्टीमध्ये अंकिता झळकली एका नव्या अंदाजात
Ankita's cocktail party : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असताना आता तिच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर आले आहेत.
Ankita’s cocktail party : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असताना आता तिच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर आले आहेत.
आज म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी अंकिता वालावलकर कुणाल भगत सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. १२ फेब्रुवारीला तिचा मेहंदी कार्यक्रम झाला असून १३ फेब्रुवारी २०२५ रोजी साखरपुडा पार पडला आहे. तर १५ फेब्रुवारीला तिच्या घरी कॉकटेल पार्टी पार पडली. या सोबतच अंकिताचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.तर या कॉकटेल पार्टीमध्ये अंकिताने स्लिट रेड वेलवेट गाऊन परिधान केला होता व त्यावर तिने ग्रीन डायमंडचे इअररिंग वेअर केले होते. त्यात ती खुपच सुंदर दिसत होती. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने नेव्ही ब्लू रंगाचा ब्लेजर परिधान केला होता.अंकिता आणि कुणालची कॉकटेल पार्टी देवबागच्या बीचवर पार पडली असून पार्टीला नॅचरल लूक देण्यात आला होता. अतिशय मनमोहक आणि सुंदर सजावट करण्यात आली होती.अंकिता आणि कुणालने सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शूट केला असून फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर हे मेड फॉर इच अदर जोडी गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र, आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर हा लग्नसोहळा कोकणी पद्धतीने पार पडणार आहे.