spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

आई कुठे काय करते’ या मालिकेतली अरुंधती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; निवेदिता सराफ आणि मधुराणी प्रभुलकर या दोघी एकत्र झळकणार

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती मात्र आता ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला एका न्या रूपात येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ आणि मधुराणी प्रभुलकर या दोघी अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती मात्र आता ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला एका न्या रूपात येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ आणि मधुराणी प्रभुलकर या दोघी अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

‘आई कुठे काय करते’ मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यानंतर आता स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे. अशातच आता या मालिकेत अरुंधतीची एन्ट्री होणार आहे.
मालिकेत सध्या स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे. येत्या काही दिवसातच अरुंधती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाली,”पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतंय याचा अतिशय आनंद होतोय. प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा अरुंधतीला मिस करत आहेय.” सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळणार आहे. असे मधुराणी म्हणाली.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ आणि मधुराणी प्रभुलकर या दोघी एकत्र झळकणार असून त्यांचा एक खास फोटो खूप व्हायरल होत आहे. त्यात दोघीनींही पारंपरिक दागिने घालून मराठमोळा साजशृंगार केला आहे.
आता ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत ती दिसणार आहे. नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटत असल्याचं देखील तिने सांगितलं.

Latest Posts

Don't Miss