Balasaheb Thackeray Death Anniversary :आज शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज बारावा (Balasaheb Thackeray Smrutidin) स्मृतिदिन असून आज त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. या साथी शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला फुलांची आकर्ष सजावट करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून या ठिकाणी येणाऱ्यांची रिघ लागली आहे. २३ जानेवारी १९२६ रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. स्मृतिदिनानिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही खास छायाचित्र पोस्ट शेअर केली आहे.