spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Chhaava : छावा चित्रपटात झळकले हे १० मराठी कलाकार

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यासोबतच एक दोन नव्हे तर तब्बल १० मराठी कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

Chhaava: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यासोबतच एक दोन नव्हे तर तब्बल १० मराठी कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला “छावा” हा चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर धूमाकूळ घालत आहे. चित्रपटाने अवघ्या ७ दिवसात २२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटात अनेक मराठमोळे चेहरेही झळकले असून त्यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

संतोष जुवेकर – संतोष जुवेकरने छावा चित्रपटात रायाजींची भूमिका साकारली आहे. मराठा मावळा म्हणून संतोष जुवेकरने एक वेगळी छाप टाकली आहे. त्याचे या चित्रपटातील अभिनयाचे फारच कौतुक होत आहे.
शिवराज वाळवेकर – छावा चित्रपटात साकारलेली बहिर्जी नाईकांची भूमिका ही देखील एका मराठी अभिनेत्याने साकारली आहे. छावामध्ये बहिर्जी नाईक यांची भूमिका अभिनेता शिवराज वाळवेकर यांनी साकारली आहे. त्यांनी बहिर्जी नाईक साकारताना महाराजांना मदत करताना विविध वेशभूषा रंगवल्या आणि रसिकांच्या मनावर छाप सोडली. त्यांच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे.
आस्ताद काळे – बिग बॉस फेम, नाटक, चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता आस्ताद काळे याने या चित्रपटात सूर्या हे पात्र साकारले आहे.

 

सारंग साठ्ये – या चित्रपटात सारंग साठ्येनेही नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्याने गणोजी शिर्केचे पात्र रंगवले आहे. गणोजी शिर्के हे येसूबाईचे भाऊ दाखवले आहेत.
नीलकांती पाटेकर – ‘छावा’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकरांनीही काम केलं आहे. या चित्रपटात त्यांनी धाराऊ ची भूमिका साकारली. धाराऊ या शंभूराजेंच्या दूधआई होत्या.
सुव्रत जोशी – तसेच अभिनेता सुव्रत जोशीने यात कान्होजी शिर्के ही भूमिका साकारली आहे. कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडतात.
किरण करमरकर – प्रसिद्ध अभिनेते किरण करमरकर यांनी छावामध्ये अनाजीपंत यांचे पात्र साकारले आहे.
मनोज कोल्हटकर – छावा या चित्रपटात अभिनेते मनोज कोल्हटकर यांनी बालाजी यांचे पात्र साकारले आहे.
आशिष पतोडे – अभिनेता आशिष पतोडे याने या चित्रपटात अंताजींची भूमिका साकारली आहे.

 

Latest Posts

Don't Miss