spot_img
spot_img

Latest Posts

चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा भव्य दिव्य आगमन सोहळा, एक झलक तर नक्की बघाच…

चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा आज ९ सप्टेंबर २०२३ रोजी होत आहे. संध्याकाळपासून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा आज ९ सप्टेंबर २०२३ रोजी होत आहे. संध्याकाळपासून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील हे एक प्रसिद्ध गणपती मंडळ आहे. या गणपतीच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी लाखो भाविक येत असतात. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जलोशात साजरा करण्यात येतो. आज चिंतामणीचा आगमन सोहळा आहे. मोठ्या जलोश्यात आणि आनंदात या गणपतीचे आगमन करण्यात येते. मुर्तीकार रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेतून चिंचपोकळी चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुणेरी ढोलताशाच्या गजरात या गणपतीचे आगमन केले जाते. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाला १०४ वर्ष पूर्ण झाली आहेत.

‘ध्यानी मनी, चिंतामणी’ म्हणत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाची स्थापना १९२० साली झाली. मुंबईत स्थापन झालेले हे दुसरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणाऱ्या पहिल्या तीन मंडळांमध्ये चिंचपोकळीच्या या मंडळाच नाव अभिमानाने घेतलं जात आहे.
चिंतामणी मंडळाने १९४५ साली रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले होते.
चिंतामणी गणपती चिंचपोकळी रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच असल्यामुळे याचे नामकरनच “चिंचपोकळी चा चिंतामणी ” असे झाले .
गणपतीची गणेश मूर्ती आधीच्या काळी प्रसिद्ध शिल्पकार दीनानाथ वेलिंग हे बनवायचे.त्यांच्या नंतर हि गणेश मुर्ति स्वर्गीय. विजय खातू यांच्या कलाशाळेत बनवली जाते.तर विजय खातू यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी रेश्मा खातू ही गणपती बनवते.

Latest Posts

Don't Miss