spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Manmohan Singh Passes Away: मनमोहन सिंग यांचे शिक्षण किती? जाणून घेऊया राजकीय कारकीर्द ?

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी दिल्‌ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या आाधातकालीन विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात भारताचे पंतप्रधानपद भूषवले होते. भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतातील महीन अर्थतज्ञांपकी से एक मानले जात होते. त्यांच्या शिक्षण आणि राजकीय कारकिर्दीशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

 

माजी पंतप्रधान असण्यासोबतच डॉ. मनमोहन सिंग हे उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जात होते. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले होते. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
यानंतर मनमोहन सिंग केंब्रिजला गेले. तेथून ते ऑक्सफर्डला गेले आणि तिथेही उच्च शिक्षण घेतले. त्यांनी ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी घेतली आहे. डॉ. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्राचे शिक्षक होते आणि ते पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापकही होते.
सन १९८५ मध्ये मनमोहन सिंग यांची राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी हे पद ५ वर्षे सांभाळले. १९९० मध्ये ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार बनले.
डॉ. मनमोहन सिंग हे १९८२ ते १९८५ या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही होते. याव्यतिरिक्त त्यांनी १९६६-१९६९ दरम्यान आर्थिक घडामोडींवर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी आर्थिक व्यवहार अधिकारी म्हणून काम केले.
डॉ. मनमोहन सिंग हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये २००४ ते २०१४ अशी सलग १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभा सदस्य झाल्यावर सुरू झाली.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. मनमोहन सिंग १ ऑक्टोबर १९९१ ते १४ जून २०१९ पर्यंत सलग पाच वेळा राज्यसभेचे सदस्य होते. यानंतर ते पुन्हा २० ऑगस्ट २०१९ ते ३ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य झाले.

डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९८ ते २००४ या काळात सभागृहात विरोधी पक्षनेतेपदही भूषवले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये २००४ ते २०१४ अशी सलग १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते.
यानंतर २००४ साली मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. या काळातही त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याचे महत्वाचे काम केले. पंतप्रधान असताना त्यांनी जीडीपी वाढ ८ ते ९ टक्क्यांवर नेला. जेव्हा भारत जगातील दुसरी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला तेव्हा हा ऐतिहासिक उच्चांक होता.
मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (NREGA) सुरू करण्यात आली होती. जी देशासाठी ऐतिहासिक योजना होती. आता ही योजना मनरेगा म्हणून ओळखली जाते. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात २००६ मध्ये देशात विशेष आर्थिक क्षेत्र सुरू केले.

Latest Posts

Don't Miss