spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Dev Uthani Ekadashi: गरजे पंढरपूर… कार्तिक एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी पंढरपूरची यात्रा, चातुर्मास समाप्ती आणि तुळशी विवाह या दिवसाचे खास वैशिष्ट्ये आहे. वर्षात दोन मोठ्या एकादशी येतात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त होतो आणि ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. आज मंगळवारी १२ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी मोठ्या उत्सहात साजरी जाते. आजच्या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. तसेच कार्तिकी शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी, देवउठनी एकादशी किंवा बोधनी एकादशी असेही म्हणतात.

१) आज कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथी आहे, या एकादशीला देवउठनी एकादशी आणि देव प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात.
२) या देवउठनी एकादशी दिवशी तुळशी विवाह देखील साजरा केला जातो.
३) देवउठनी एकादशीला महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठूरायाची आणि रूक्मिणी देवीची खास पूजा केली जाते. एकादशीच व्रत काळजी पूर्वक केले जाते, तसेच विठू भक्त विठ्ठल-माऊलीचे दर्शन घेतात.
४) कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.
५) पाच लाख भक्त कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी कोकण, कर्नाटक आणि गोवा या प्रांतातून भाविक जास्त संख्येने दर्शनासाठी येत असतात.
७) आपल्या लाडक्या माऊलीचे गोजिरसाजिरं रूप पाहण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.
८) संपूर्ण पंढरपूर विठू माऊलीच्या नावाने दुमदुमून गेली आहे.

 

राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी मनसेने ‘या’ बड्या नेत्याला दिले सभेचे निमंत्रण

Shahrukh Khan Threat : शाहरुख खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एक संशयित ताब्यात

Latest Posts

Don't Miss