Thursday, November 30, 2023

Latest Posts

दिवाळीनिमित्त सोनाली कुलकर्णीच्या खास लूकनं वेधलं लक्ष

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या नवनव्या लूकने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतं असते,सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपक्रात राहत असते.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या नवनव्या लूकने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतं असते,सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपक्रात राहत असते.चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंट्स करत असतात.सोनालीचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
सोनालीनं दिवाळीनिमित्त नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनालीनं पती कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.”happy diwali “, असं कॅप्शन सोनालीनं या फोटोला दिलं आहे.
सोनालीनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांनी फोटोला कमेंट करुन सोनाली आणि कुणाल यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2021 मध्ये कुणाल आणि सोनाली यांनी लग्नगाठ बांधली.सोनाली ही कुणालसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
निळी साडी , स्लिवलेस ब्लाउज, नाकात नथ, मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरी, तसेच कुणालने ही सोनालीच्या साडीला मॅच करणारा कुर्ता परिधान केला आहे.दरम्यान दोघांच्या ही अशा खास लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.
दरम्यान या दोघांच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

Latest Posts

Don't Miss