spot_img
spot_img

Latest Posts

छोट्या पडद्यावरील मालिकेंचा टीआरपी रेटिंग,कोणत्या मालिकेनं मारली बाजी ?

छोट्या पडद्यावर 'ठरलं तर मग' या मालिकेला सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये आपल्याला दर आठवड्याला चढ-उतार पाहायला मिळतोच.मालिका विश्व हे प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन नेहमी करत असतं, दरम्यान आता या मालिकांमधील टीआरपी रेटिंग समोर आले आहे.जाणून घेऊयात या आठवड्यात कोणत्या मालिकेने टीआरपी रेटिंग मध्ये आपलं पहिलं स्थान निर्माण केलं आहे.

 

टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.
टीआरपी लिस्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.
‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्यनुसार या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.4 रेटिंग मिळाले आहे.
टीआरपीच्या शर्यतीत ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.
‘अबोली’ ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.

‘शुभविवाह’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.

Latest Posts

Don't Miss