Friday, December 1, 2023

Latest Posts

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा हटके अंदाज

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटात देखील दिसून आली आहे.तमन्ना ही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटात देखील दिसून आली आहे.तमन्ना ही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.ती तिचे नवनवीन फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.तिने शेअर केलेल्या फोटो किंवा पोस्टला तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असते.

तमन्ना भाटियाने आपल्या अभिनयाची शैली साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत पोहचवली आहे.
तमन्ना तिच्या चित्रपटांशिवाय, तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि सौंदर्यासाठी देखील चर्चेत असते.
तमन्नाचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय होऊ लागली आहे.
नुकतच फोटोशूटसाठी, तमन्नाने काळ्या शेडचा इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला आहे, ज्यावर सुंदर हिरव्या धाग्याचे भरतकाम केले आहे. या लूकमध्ये तमन्ना नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे.
त्याचबरोबर या लुकमध्ये रॉयल टचही पाहायला मिळतो. तमन्नाने हा अवतार खूप फ्लॉंट केला आहे.
दुसरीकडे, तमन्नाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्री लवकरच वांद्रे नावाच्या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.
यानंतर ती ‘वेडा’ नावाच्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

Latest Posts

Don't Miss