spot_img
spot_img

Latest Posts

G20 Summit, जगभरातील अनेक नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक, पाहा काही फोटोज…

G20 शिखर परिषदेला उपस्थित असलेले परदेशी पाहुणे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर (Rajghat) पोहोचले आहेत. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खादीची शाल घालून सर्वांचे स्वागत केले. महात्माजींना आदरांजली वाहल्यानंतर नेते लीडर्स लाउंजमध्ये शांतता भिंतीवर स्वाक्षरीही करतील. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा प्रथम आले.

आज पंतप्रधान मोदी G20 तील जागतिक नेत्यासोबत राजघाटावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 तील जागतिक नेत्यांनी नवी दिल्लीतील G20 परिषदेच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली.
ब्राझिलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो दा सिल्वा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींसह ब्राझिलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो दा सिल्वा आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
ओमानचे उपपंतप्रधान असद बिन तारिक बिन तैमूर अल सईद हे राजघाटावर आले होते. सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग हेसुद्धा राजघाटावर पोहोचले होते.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांनीही महात्मा गांधींच्या समाधीस्थळी येऊन श्रद्धांजली वाहिली. राजघाट परिसरात येताच पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांचं स्वागत केलं, त्यांना खादीची भेट दिली.

Latest Posts

Don't Miss