Gajanan Maharaj Prakat Din : विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून शेगावमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय. आज म्हणजे २० फेब्रुवारी रोजी त्यांचा प्रकट दिन असून या उत्सवात सर्व भक्तगण शेगावाला भेट देत आहेत.



