spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन; पहा फोटो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणार्‍या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण पार पडले.

या कोस्टल रोडच्या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तरवाहिनीचे लोकार्पण होत असून या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
कॅबिनेट सहकाऱ्यांसोबत विंटेज गाडी चालवण्याच्या दुर्मिळ विशेषाधिकाराचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तर त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर सहकारी नेत्यांनी देखील या विशेष अधिकाराचा आनंद घेतला.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Latest Posts

Don't Miss