spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

भारताची भूमिकन्या PV Sindhu अडकली लग्नबंधनात; उदयपूरमधून ग्रँड लग्नाचे Photos आले समोर

PV Sindhu Wedding Photos : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू अडकली लग्नबंधनात. व्यंकट दत्ता साई याच्या सोबत लग्न बंधनात अडकली. उदयपूर येथे दोघांच्या ग्रँड लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

 

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच लग्न 22 डिसेंबर रोजी उदयपूर येथील सागर तलावावर असलेल्या राफेल हॉटेलमध्ये झाले. या ग्रँड लग्नाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. 20 तारखेपासून उदयपूर येथे सिंधू आणि व्यंकट यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सुरु होते.
पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई हा साई पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहे
पीव्ही सिंधूने तिच्या लग्न सोहोळ्यासाठी पीएम नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर यांच्या सह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रण होते. यापैकी काहींनी उदयपूर येथील लग्नाला हजेरी देखील लावली.
काहीच दिवसांपूर्वी पीव्ही सिंधूचा साखरपुडा पार पडला. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सिंधूने देशासाठी अनेक ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.
पीव्ही सिंधूच्या उत्कृष्ट खेळामुळे तिला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. ती बॅटमिंटनच्या सर्वात मान्यताप्राप्त खेळाडूंपैकी एक मानली जाते.

Latest Posts

Don't Miss