spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Kiara Advani Pregnant : कियारा आणि सिद्धार्थच्या घरी लवकरचं पाळणा हलणार; फोटो शेयर करत दिली गुड न्यूज

आलिया, दीपिका यानंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं एक खास फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले. जैलसरमेर मधील सूर्यगड पॅलेसवर त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियारा आणि सिद्धार्थ आई-बाबा होणार आहेत.
नुकतीच सोशल मीडियावर कियारा-सिद्धार्थ खास पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये कियारा-सिद्धार्थने हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट केलं आहे. हा सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लवकरच ते आपल्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट…,लवकरच येत आहे…” अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्यामुळे त्यांचे सगळे चाहते तसेच मनिरंजनविश्वातून या कपलाल त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
किआरा नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. कियाराचा हा ड्रेस अतिशय ढगळा होता, तसंच तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून नेटकऱ्यांनी किआरा गरदोर असल्याचा अंदाज बांधलाच होता.

Latest Posts

Don't Miss