बैलपोळा हा सण भाद्रपद अमावस्येला तिथीनुसार साजरा केला जातो. या दिवसाला बैलाचा सण असे देखील बोलले जाते. हा सण विदर्भात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. हा दिवस बैलाच्या विश्रांतीचा दिवस असतो. बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. या दिवशी नैवेद्य म्हणून भात आणि पुरणपोळी खायला दिली जाते. काही ठिकाणी या सणाला बेंदूर असे बोलले जाते.
Latest Posts
बैलपोळा संदर्भात जाणून घ्या खास गोष्टी…
बैलपोळा हा सण भाद्रपद अमावस्येला तिथीनुसार साजरा केला जातो. या दिवसाला बैलाचा सण असे देखील बोलले जाते.