Kokan Hearted Girl: बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर काल लग्नबंधनात अडकली. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा कोकणात अगदी थाटामाटात पार पडला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.






