spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात ‘या’ पदार्थाचा आस्वाद घ्या.

महाकुंभ मेळा हा एक विशाल धार्मिक मेळा आहे, जो प्रत्येक 12 वर्षांनी एका विशेष स्थळी (प्रमुख चार कुंभ स्थानांपैकी एक) आयोजित केला जातो. यामध्ये लाखो साधू-संत, भक्त आणि पर्यटक सहभागी होतात. कुंभ मेळा चार प्रमुख स्थानांवर भरतो: प्रयागराज (उत्तर प्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड), उज्जैन (मध्य प्रदेश) आणि नाशिक (महाराष्ट्र). हा मेळावा अध्यात्मिक आहेच त्याचबरोबर येथे विविध भारतीय पदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकता.

महाकुंभ मेला हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा समारंभ आहे. येथे स्नान केल्याने पापं धुतली जातात आणि मोक्ष प्राप्तीची मान्यता आहे. महाकुंभ मेळा हा पौराणिक कथेवर आधारित आहे. मान्यता आहे की, देवते आणि राक्षसांनी समुद्र मंथन करून अमृत मिळवले आणि ते अमृत कुंभमधून गळून पडले. त्या अमृताच्या चौघड्यांसाठी कुंभ मेळा आयोजित केला जातो. यंदा हा कुंभमेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. तुम्ही यंदा महाकुंभ मेळाव्याल भेट देण्याचा विचार करत असाल तर या पदार्थांची चव घ्यायला विसरू नका.
छोले- भटुरे :
उत्तर भारताची प्रसिद्ध डिश म्हणजे छोले- भटुरे. या पदार्थात छोले म्हणजे कबुली चण्याची भाजी आणि तळलेले भटुरे असतात. रस्त्यावरील कोणत्याही विक्रेते स्थानिक मसाल्यांसोबत त्यांच्या अनोख्या अंदाजात हा पदार्थ सर्व्ह केला जातो. याची चव तुम्ही नक्की घेऊन बघा.
पुरी -बटाटा भाजी :
या मेळाव्यात जाण्याचा विचार असेल तर पुरी- आलू भाजी खाऊ शकता. भारतात अनेक लोक या पुरी- बटाटा भाजीचा आस्वाद घेत असतात.
समोसे :
समोसे हा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही कुंभमेळ्यात नाश्त्यात चवदार आणि मसालेदा सामोस्याचा आस्वाद घेऊ शकता.
चाट :
कोणताही मेळावा चाट शिवाय अपूर्ण आहे. पाणीपुरीपासून ते आलू टिक्की आणि भेळ पुरीपर्यंत हे स्ट्रीट-फूड स्टेपल भारतीय खाद्यपदार्थाचा उत्साह वाढवतात.
खिचडी :
खिचडी हा भारतीय आहाराचा एक लोकप्रिय आणि पारंपारिक पदार्थ आहे.संपूर्ण भारतात खिचडीला महत्त्व असलेली एक चविष्ट आणि पोषक थाळी मानली जाते. त्यामुळे याचा आस्वाद नक्की घ्या.
खीर :
खीर हा भारतीय मिठाईचा एक लोकप्रिय पदार्थ आहे, खीरला भारतीय संस्कृतीत धार्मिक महत्त्व आहे. कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात खीर बनवली जाते.

Latest Posts

Don't Miss