आज २० नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली असून, संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्येक नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बाजवताना दिसत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. संपूर्ण राज्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. तसेच विधानसभा निवडणूक गेल्या महिनाभर प्रचाराने गाजवलेले मतदान आज होत असून त्यात ४१३६ उमेदवाराचं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे.