Makar Sankranti 2025 : ‘या’ मराठी अभिनेत्रींनीं उत्साहात मकर संक्रांत साजरी करत फोटोस केले शेयर, नक्की जाणून घ्या.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मकर संक्रांतीनिमित्त काळ्या साडीतील तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर केले आहेत. काळ्या रंगाची डिझाइनर साडी आणि त्यावर गोल्डन ज्वेलरी वेयर केलेली दिसत आहे.या फोटोशूटवेळी सईने विविध पोज देत सुंदर फोटो क्लिक केले आहेत, आणि हे फोटो शेयर करत तिने ‘हॅप्पी संक्रांत’ असे कॅप्शन दिले आहे.अभिनेत्री सायली संजीवने काळ्या रंगाची साडी आणि काळा ब्लाऊज परिधान केला आहे. यामध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त अभिनेत्री श्रुती मराठे हिने देखील फोटो शेयर करत तिने तिच्या फॅन्सना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.या सगळ्यात अमृताही मागे राहिली नाही. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील काळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून नाकात नथ घालून दर्जेदार मराठमोळा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.