मराठमोळी यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी सध्या चांगलीच चर्चेत असून येत्या २५ फेब्रुवारीला ती लग्नबंधनात अडकणार आहे. मराठमोळी यूट्यूबर प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंड नेपाळी असून त्याच नाव वृषांक खनालशी आहे. प्राजक्ता व वृषांक गेली १३ वर्षे एकमेकांबरोबर आहेत. प्राजक्ताचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. त्यानंतर दीड वर्षांनी ती लग्नबंधनात अडकणार आहे.




