spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

Merry Christmas: ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच साजरा करण्यामागचं नेमकं कारण काय?

why Christmas is celebrated in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? जाणून घेऊया सविस्तर

डिसेंबरचा महिना सुरु आहे आणि या महिन्यात सगळ्यांना ख्रिसमसचे वेध लागतात. सगळीकडे ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला त्यामुळे हा दिवस प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो. संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो.
ख्रिसमस हा ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. तुम्हाला माहित आहे का ख्रिश्चन लोक यादिवशी येशूचा जन्मदिवस साजरा करीत नव्हते. कारण कुणालाच येशूचा जन्म कोणत्या तारखेला झाला, याविषयी माहीत नव्हते.
ख्रिसमसची सुट्टी आणि ही तारीख प्राचीन ग्रीको रोमनमध्ये उदयास आली. कारण दुसऱ्या शतकापासून येशूचा जन्मदिवस साजरा करण्यास सुरुवात झाली असावी असे म्हटले जाते, या डिसेंबरच्या तारखेमागे तीन मुख्य कारणे आहेत.
रोमन ख्रिश्चन इतिहासकार सेक्स्टस ज्युलियस ऑफ्रिकन्स यांनी असे म्हटले आहे कि येशूच्या गर्भधारणेची तारीख २५ मार्च अशी सांगितली जाते आणि याच दिवशी जगाची निर्मिती झाली असे ऑफ्रिकन्स यांनी सांगितले. त्या तारखेच्या नऊ महिन्यानंतर म्हणजे २५ डिसेंबरला येशूचा जन्म झाला असावा अशी आख्यायिका आहे.
तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यदरम्यान यांनी त्यावेळी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता, ते लोक २५ डिसेंबर हा सूर्यांचा पुनर्जन्म म्हणून साजरा करायचे. रोमन सण सॅटर्नलिया त्या दिवशी साजरा केला जायचा. या सणाला लोक एकमेकांना खाऊ घालायचे आणि भेटवस्तू द्यायचे.
त्याशिवाय २५ डिसेंबर हा इंडो-युरोपियन देवता मिथ्राचा जन्मदिवस होता. ही तेज आणि प्रामाणिकपणाची देवता मानली जाते. त्यावेळी रोमन सैनिक त्याला खूप मानायचे.
रोमच्या चर्चमध्ये कॉन्स्टंटाईनच्या कारकिर्दीत ३३६ मध्ये २५ डिसेंबर रोजी औपचारिकपणे ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात झाली. कॉन्स्टंटाईनने याने त्याच्या साम्राज्यात ख्रिश्चन धर्माला अधिक महत्त्व दिले.
म्हाला आश्चर्य वाटेल why Christmas is celebrated in December की, पूर्वेकडे २५ डिसेंबर या तारखेला मान्यता नव्हती. अर्ध्या शतकापर्यंत तिथे ६ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जायचा. नवव्या शतकापर्यंत ख्रिसमस हा महत्त्वाचा सण मानला जायचा नाही.

Latest Posts

Don't Miss