Mumbai : Mumbai Attack २६/११ चा दहशतवादी हल्ला कुणीही विसरू शकत नाही. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी या दिवशी पुन्हा समोर येतातच. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज तब्बल १६ वर्षे पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं. अनेक परदेशी नागरिकांनही यात आपला जीव गमावला.