spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान करत केलं अमृतस्नान; पहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अमृतस्नान केलं. त्याचवेळी पंतप्रधानांसोबत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अमृतस्नान केलं. त्याचवेळी पंतप्रधानांसोबत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये अमृतस्नान करत स्नानानंतर त्यांनी गंगेला दूध अर्पण केलं आणि पूजा केली.
मोदींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. याशिवाय गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. पूजा करत असताना मंत्रोच्चारणादरम्यान एकट्यानेच संगमावर डुबकी लावली. महाकुंभमधील या पवित्र स्नानाला अत्यंत महत्त्व आहे.
पंतप्रधान मोदी मोटर बोटीने योगींसह संगमावर पोहोचले.भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी बमरौली एअरपोर्टमधून हेलिकॉप्टरने अरैलला पोहोचले. येथून बोटीने ते महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी आले.
मोदींनी आजचा ५ फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे यादिवशी माघ अष्टमी असल्याकारणाने हिंदू कॅलेंडरनुसार भक्ती, दानधर्म, तपश्चर्या यांमध्ये माघ अष्टमी हा दिवस शुभ मानला जातो.अध्यात्मिक विकासासाठी हा दिवस चांगला मानला जातो.

Latest Posts

Don't Miss